आयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या फायनलमध्येही खेळत आहेत

मुंबई | आज वानखेडेवर आयपीएल २०१८च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात ५ असे खेळाडू खेळत आहे जे २००८च्या अंतिम फेरीतही खेळले होते.

१ जून २००८ रोजी मुंबईमधील डीवाय पाटील स्टेडियमवर झाला होता. त्यात राजस्थान राॅयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा सामना झाला होता.

त्यावेळी चेन्नईकडून खेळणारे सुरेश रैना आणि एमएस धोनी आजही त्याच संघाकडून खेळत आहे तर राजस्थान राॅयल्स तेव्हा युसुफ पठाण, रविंद्र जडेजा आणि शेन वाॅटसन हे खेळाडू खेळले होते. त्यातील आज युसुफ पठाण हैद्राबादकडून तर रविंद्र जडेजा आणि शेन वाॅटसन चेन्नईकडून खेळत आहेत.

त्या सामन्यात चेन्नईकडून धोनीने नाबाद २९तर  सुरेश रैनाने ४३ धावा केल्या होत्या. तर राजस्थानकडून युसुफ पठाणने ३ विकेट्स आणि ५६ धावा, रविंद्र जडेजाने ० धावा तर शेन वाॅटसनने ९ धावा केल्या होत्या.

त्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केलेल्या युसुफ पठाणची आजची कामगिरीही चांगली होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी

आयपीएल विजेते होणार मालामाल, मिळणार मोठे बक्षीस

त्या शाॅटवर षटकार नाही तर अष्टकारचं द्या!

आयपीएलमधील आजपर्यंतचा सर्वात खास विक्रम रैना आज करणार!

-तर धोनी करणार ४८ तासांत तो विक्रम आपल्या नावावर!

एबी डिव्हिलियर्सच्या नावाने कुणी दिली शेगांव संस्थानला देणगी?