विम्बल्डन: ३७ वर्षीय व्हेनिसकडून १९ वर्षीय ऍना कॉन्जुह पराभूत

१०व्या मानांकित व्हेनिस विल्यम्सने आज ऍना कॉन्जुहचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला. १ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात व्हेनिसने २७व्या मानांकित ऍना कॉन्जुहला ६-३, ६-२ असे पराभूत केले.

याबरोबर विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारी व्हेनिस विल्यम्स गेल्या २३ वर्षातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरली आहे. १९९४ साली मार्टिना नवरातिलोवा ही सर्वात वयस्कर खेळाडू होती जिने विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
याबरोबर व्हेनिस विल्यम्स १३व्यांदा विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरीत पोहचली आहे. यापूर्वी ५वेळा व्हेनिसने विम्बल्डनचे विजेतेपद मिळवले आहे.

व्हेनिस विल्यम्सने जेव्हा १९९७ साली प्रथमच कारकिर्दीत प्रथमच फ्रेंच ओपनच्या रूपाने ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळली होती त्या वर्षी ऍना कॉन्जुहचा जन्म झाला होता.

व्हेनिसचा पुढील सामना १३ व्या मानांकित जेनेलिया ओस्टॅपेन्कोशी होणार आहे.