आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेत सय्यम पाटील, स्मित उंद्रे, अक्षत दक्षिणदास, क्रिशय तावडे, स्वानीका रॉय यांचा मानांकीत खेळाडूंवर विजय 

पुणे: पीएमडीटीए यांच्यातर्फे आयोजित  8 व 10 वर्षाखालील गटातील आयकॉन ग्रुप लिटिल चॅम्पियनशिप सिरीज 2018 स्पर्धेच्या चौथ्या मालिकेत 8 वर्षाखालील मिश्र गटात सय्यम पाटील, स्मित उंद्रे, अक्षत दक्षिणदास, क्रिशय तावडे व स्वानीका रॉय यांनी मानांकीत खेळाडूंचा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

महाराष्ट्र मंडळ कटारीया हायस्कुल, मुकुंद नगर येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मिश्र गटात बिगर मानांकीत सय्यम पाटीलने चैथ्या मानांकीत  त्रिशीक वाकलकरचा  5-3 असा पराभव केला.

सोळाव्या मानांकीत स्मित उंद्रेने आपले कौशल्य पणाला लावत सदाव्या मानांकीत विरा हर्पुडेचा 5-3 असा पराभव करत आश्चर्यकारक निकालाची नोंद केली. तेराव्या मानांकीत अक्षत दक्षिणदासने आठव्या मानांकीत राम मकदुमचा  5-1 असा एकतर्फी पराभव केला तर बिगर माानंकीत क्रिशय तावडेने आकराव्या मानांकीत आदित्य योगीचा 5-3 असा पराभव करत उद्घाटनाचा दिवस गाजवला.

10 वर्षाखालील मुलांच्या गटात आठव्या मानांकीत देवराज मंदाडेने आपल्या लौकीकालै साजेशी कामगिरी करत शयन डे याचा  5-1 असा सहज पराभव केला. कार्तिक शेवाळेने  अवनिश गवळीचा तर निल केळकरने मनविंदर त्रिवेदीचा 5-0 असा पराभव केला.

10 वर्षाखालील मुलींच्या गटात आठव्या मानांकीत स्वानीका रॉयने चौथ्या मानांकीत आरोही देशमुखचा  5-3 असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल – पहिली फेरी

8 वर्षाखालील मिश्र गट

सय्यम पाटील वि.वि त्रिशीक वाकलकर(4) 5-3

स्मित उंद्रे(16) वि.वि विरा हर्पुडे (6) 5-3

अक्षत दक्षिणदास(13) वि.वि राम मकदुम(8) 5-1

 

क्रिशय तावडे वि.वि आदित्य योगी(11) 5-3

काव्या पांडे(15) वि.वि दर्शा ओझा 5-2

अझलन शेख(12) वि.वि सृष्टी सुर्यवंशी(17) 5-0

सुजय देशमुख(3) वि.वि विरेन चौधरी 5-2

10 वर्षाखालील मुले

कार्तिक शेवाळे वि.वि अवनिश गवळी 5-0

निल केळकर वि.वि मनविंदर त्रिवेदी 5-0

देवराज मंदाडे(8) वि.वि शयन डे 5-1

अमन शाह वि.वि सनत काडले 5-2

निनाद पाटील वि.वि विरेन चौधरी 5-4

कविन शिंदे वि.वि स्मित उंद्रे 5-3

10 वर्षाखालील मुली

स्वानीका रॉय(8) वि.वि आरोही देशमुख(4) 5-3