पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज टेनिस 2019 स्पर्धेत मृणाल शेळके, अमोद सबनीस, निशिता देसाई, रितिका मोरे, सिमरन छेत्री यांचे सनसनाटी विजय

पुणे |  पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत मृणाल शेळके, अमोद सबनीस, निशिता देसाई, रितिका मोरे, सिमरन छेत्री या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगरमानांकित मृणाल शेळके हिने आपली अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवत पाचव्या मानांकित दुर्गा बिराजदारचा 6-2 असा सहज पराभव केला. आठव्या मानांकित रितिका मोरे हिने चौथ्या मानांकित अंजली निंबाळकरचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सातव्या मानांकित निशिता देसाई हिने दुसऱ्या मानांकित गायत्री मिश्रावर टायब्रेकमध्ये 6-5(5) असा विजय मिळवला.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकित अमोद सबनीस याने अव्वल मानांकित अर्णव ओरुगंतीचा 6-3 असा एकतर्फी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. तिसऱ्या मानांकित पार्थ देवरूखकरने सोहम अमुंडकरचा 6-4 असा तर, सातव्या मानांकित हर्ष ठक्कर याने बाराव्या मानांकित ऐत्रेया रावचा 6-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:  
मृणाल शेळके वि.वि.दुर्गा बिराजदार(5) 6-2;
रितिका मोरे(8)वि.वि.अंजली निंबाळकर(4) 6-4;

श्रावणी देशमुख वि.वि.शौर्या सूर्यवंशी 6-2;
निशिता देसाई(7)वि.वि.गायत्री मिश्रा(2) 6-5(5);

14 वर्षाखालील मुले: उप-उपांत्यपूर्व फेरी:
अमोद सबनीस वि.वि.अर्णव ओरुगंती(1) 6-3;
अनिश रांजळकर(5)वि.वि.शारंग कळसकर 6-1;
सार्थ बनसोडे(4)वि.वि.अर्जुन किर्तने(15) 6-3;
आदित्य भटवेरा(9)वि.वि.दिव्यांक कोवतके 6-2;
केयूर म्हेत्रे(11)वि.वि.गौरव सारडा 6-4;
पार्थ देवरूखकर(3)वि.वि.सोहम अमुंडकर 6-4;
हर्ष ठक्कर(7)वि.वि.ऐत्रेया राव(12) 6-1;
आदित्य राय(2)वि.वि.प्रणव इंगोळे 6-1;

14 वर्षाखालील मुली: उपांत्यपूर्व फेरी:
कौशिकी समंता(1)वि.वि.यशिका बक्षी(8) 6-1;
सिमरन छेत्री(7)वि.वि.सिद्धी खोत(3) 6-1;
श्रुती नानजकर(4)वि.वि.समृद्धी भोसले(5) 6-2;
अलिना शेख(6)वि.वि.श्रावणी देशमुख 6-4.