इशांत शर्माचे कौंटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण!

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने यावर्षी कौंटी क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले आहे. त्याने हे पदार्पण वॉरविकशायर विरूद्ध सक्सेस संघाकडून खेळताना केले आहे. 

13 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान झालेल्या पदार्पणाच्या सामन्यात इशांतने 5 विकेट्स घेतल्या आहेत. यासाठी त्याने फक्त 69 धावा दिल्या आहेत. 

हा सामना अनिर्णित राहीला. इशांतने पहील्या डावात 53 धावा देत 3 विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या डावात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर इशांतने फलंदाजी करताना 22 धावाही केल्या आहेत.

या सामन्यात वॉरविकशायरने पहील्या डावात सर्वबाद 299 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात 3 बाद 87 धावा केल्या. सक्सेस संघाने पहील्या डावात सर्वबाद 374 धावा केल्या. 

इशांतची ही कामगिरी भारताच्या दृष्टीने चांगली आहे, कारण भारत जुलै महीन्यात इंग्लडचा दौरा करणार आहे. इशांतला यावर्षी आयपीएल लिलावात कोणत्याच संघाने विकत न घेतल्याने त्याने कौंटी क्रिकेटचा मार्ग धरला आहे.