अबब! भारतीय फूटबॉल संघाची जर्सी घ्यायला तुम्हाला मोजावी लागणार मोठी रक्कम !

भारतात होणारा फिफाचा अंडर १७चा विश्वचषक काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतामध्ये त्यामुळे या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता वाढत आहे. त्यात अनेक कारणांमुळे अनेक चर्चाना उधाण येत आहे. फ़ुटबॉलमध्ये स्वतःच्या संघाच्या जर्सीसाठी खूप आत्मीयता असते. आपल्या देशाची जर्सी आपण परिधान करावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. भारतासारख्या देशात तर प्रत्येकाला देशाची जर्सी घालण्याचे दिवास्वप्ने पडलेली असतात.

भारताच्या अंडर १७ फ़ुटबॉल संघाच्या जर्सीची किंमत सांगितली तर तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. नायके या खूप प्रसिद्ध ब्रॅंडने भारताची जर्सी बनवली आहे. या जर्सीची किंमत आहे तब्बल ४,६९५ रुपये. डिलिवरी आणि हँडलिंग चार्जेस मिळून एक जर्सी विकत घेण्यासाठी आपणाला ५,४९५ रुपये इतकी मोठी किंमत मोजावी लागते. युरोपातील काही मोठ्या क्लबच्या जर्सीच्या तुलनेत देखील हे किंमत जास्त आहे.

भारताची फ़ुटबॉलची बाजारपेठ पाहता ही किंमत खूप अवाजवी भासते. त्यामुळे अनेक स्थरातून यांच्यावर टीका होत आहेत. प्रामुख्याने ट्विटरवर अनेकजण आपले मत व्यक्त करत आहेत. या जर्सीवर काही विशेष कामदेखील केलेले दिसत नाही जेणेकरून ती खेळाडूसाठी किंवा जे ती परिधान करणार आहेत त्त्यांना आराम मिळावा. त्यामुळे नायके कंपनीला टीकेला सामोरे जावे लागते आहे.