फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल

बुधवारी (११ जुलै) फिफा विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी  गाठली.

या सामन्यात क्रोएशियाने जादा वेळेत इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. या पराभवाबरोबरच तब्बल  ५२ वर्षांनंतर इंग्लंडचे अंतिम फेरीत जाण्याचे स्पप्न धुळीस मिळाले.

मात्र इंग्लंडच्या या पराभवाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हीड वार्नर आणि भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरला आनंद झाला आहे. या सामन्यानंतर या दोन्ही क्रिकेटपटूंनी इंग्लंडला ट्विटर वरुन क्रोएशियाच्या विजयाचा आनंद व्यक्त केला

जूनमध्ये इंग्लंड क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय मालिकेत ५-०  असा पराभव केल्याने वार्नरला इंग्लंडच्या फुटबॉल संघाच्या पराभवानंतर आनंद होणे स्वाभाविक होते.

त्याचबरोबर इंग्लंड संघाला जगभरातील इतर चाहत्यांनीही “इट्स कमिंग होम” हा हॅश टॅग वापरत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक २०१८: नाट्यमय सामन्यात इंग्लंड पराभूत, क्रोएशियाने गाठली अंतिम फेरी

-मागील 36 वर्षांपासून या क्लबचा किमान एकतरी खेळाडू फिफाचा अंतिम सामना खेळलाय