T20: प्रत्येक ४ मिनिटाला होणार एक ओव्हर कमी

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा आल्यामुळे नाणेफेकीला विलंब होत झाला आहे. आता सामना कमी षटकांचा होणार असून प्रत्येक ४ मिनिटाला एक षटक याप्रमाणे सामन्यातील षटके कमी होणार आहे.  

सामना सुरु होण्यासाठी मैदान कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. रिमझिम पाऊस पडत असताना जेव्हा मैदान कर्मचारी फिल्ड सुकवण्यासाठी मैदानात आले तेव्हा त्यांना प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला. 

आज जर हा सामना झाला नाही तर तब्बल २९वर्षांनी या शहरात पुन्हा आंतरराष्ट्रीय सामना पाहायला आलेल्या तब्बल ४० हजार प्रेक्षकांची मोठी निराशा होणार आहे. 

सामना सुरु व्हायला वेळ लागत असल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी फुटबॉल खेळण्याला प्राधान्य दिले आहे.