रणजी ट्रॉफी इतिहासात पहिल्यांदाच होताय एकाच वर्षात दोन रणजी फायलन्स

इंदोर । दिल्ली आणि विदर्भ यांच्यात आजपासून रणजी ट्रॉफी २०१७चा अंतिम सामना सुरु झाला. यावर्षी होणारा हा रणजी ट्रॉफी स्पर्धेचा दुसरा अंतिम सामना आहे.

२०१६-१७च्या मोसमातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना १० जानेवारी २०१७ रोजी होळकर स्टेडियम इंदोर येथे झाला होता. हा सामना गुजरात संघाने मुंबईविरुद्ध जिंकला होता. आज त्याच मैदानावर २०१७-१८ मोसमातील अंतिम फेरीचा सामना सुरु झाला आहे.

मोसमातील सर्वात लवकर अंतिम फेरीचा सामना सुरु होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कायम स्पर्धेचा अंतिम सामना नवीन वर्षात होत असे. परंतु ८४व्या रणजी ट्रॉफी मोसमात प्रथमच संपूर्ण स्पर्धा एकाच वर्षांत होत आहे.

मोसमात सर्वात कमी दिवसात स्पर्धेचा अंतिम सामना होण्याचा विक्रमही या मोसमात झाला आहे. यापूर्वी हा विक्रम गेल्यावेळी झालेल्या स्पर्धेत झाला होता. तसेच १० जानेवारी अर्थात खूपच लवकर मोसमातील स्पर्धेचा अंतिम सामना झाला होता.