हार्दिक पंड्या कपिल देव होऊ शकत नाही !

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात हार्दिक पंड्या त्याच्या निष्काळजीपणामुळे बाद झाला. हे बाद होताना संघ अडचणीत असताना तो ज्या पद्धतीने बाद झाला ते नक्कीच कसोटी खेळणाऱ्या कोणत्याही फलंदाजाला शोभा देणारे नव्हते.

त्यामुळे माजी क्रिकेटपटूंनी पंड्यावर जोरदार तोंडसुख घेतले. त्यात सुनील गावसकर आणि संजय मांजरेकर या दिग्गजांचा समावेश होता. पंड्या जर काल बाद झाला नसता तर भारतीय संघाला आघाडी मिळण्याची शक्यता होती.

हार्दिक पंड्याकडे अनेक दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव म्हणून पाहतात. त्याकडून मोठी अपेक्षाही आहे. असे असताना जेव्हा काल हा फलंदाज बाद झाला तेव्हा कपिल देव कधी कारकिर्दीत अश्या चुका करत नसल्याचं सोशल माध्यमांवर चर्चिल जात होत.

कपिल देव त्यांच्या कसोटी कारकिर्दीत १८४ डाव खेळले परंतु कधीही धावबाद झाले नाही. परंतु ५व्या कसोटी सामन्यातच पंड्या अशा प्रकारे बाद झाला. त्यामुळे सोशल माध्यमांवर अनेकांनी त्यावर टीका केली.