मोठी बातमी- संयुक्त राष्ट्राचे प्रमाणपत्र मिळवणारा हा ठरला पहिलाच फुटबॉल क्लब

ब्रिटीश फुटबॉल क्लबला संयुक्त राष्ट्राचे (युएन) प्रमाणपत्र मिळाले आहेत. या क्लबमध्ये अक्षय ऊर्जा आणि खेळाडूंच्या जेवणामध्ये शाकाहारी खाद्याचा वापर करतात त्यांच्या या पर्यावरण सुरक्षेच्या भुमिकेबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

फॉरेस्ट ग्रीन रोव्हर्स (एफजीआर) असे या क्लबचे नाव आहे. हा क्लब इंग्लिश फुटबॉल लीगमधील लीग दोनमध्ये खेळला असून यूएनकडून सन्मानित होणारा पहिलाच फुटबॉल क्लब आहे.

युनायटेड किंगडममधील नेल्सवर्थ येथील हा क्लब आहे. हा क्लब 2018-19साठी हवामान बदल संदर्भात युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शनशी (युएनएफसीसीसी) जोडला गेला आहे. युएनएफसीसीसीने या क्लबला जगातील पहिला कार्बन न्युट्रल फुटबॉल क्लब असे प्रमाणित केले आहे.

या क्लबमधील शाकाहारी खाद्यविषयी बोलताना क्लबचे अधिकारी म्हणाले,”हे खाद्य शरीरासाठी योग्य असून प्राण्यांचेही यामुळे रक्षण होते. तसेच उत्तम खेळाडू घडवण्याबरोबरच निसर्गातील घटकांचे संरक्षण करणे हे पण महत्त्वाचे आहे.”

तसेच सुर्य ऊर्जा वापरून रोबोट लॉनमॉवरने कापलेल्या ऑर्गनिक पिचवर येथील खेळाडू खेळतात. पावसाच्या पाण्याचा वापर या पिचवर केला जातो. चाहत्यांनी येथे यावे म्हणून एफजीआरने इलेक्ट्रीक गाड्यांची सोय केली आहे.

129 वर्षात प्रथमच या क्लबने मागील वर्षीच्या लीगमध्ये सहभाग घेतला होता. यावर्षी त्यांचे हे दुसरे वर्ष असून पुढील महिन्यात ते इंग्लंड संघाशी व्यवसायिक सामना खेळणार आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

हजाराव्या कसोटी सामन्यासाठी सर्वकालीन इंग्लंड संघाची निवड, केविन पीटरसनसह हे खेळाडू आहेत संघात

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टन्टाईनने मागितली माफी