कोहली आणि रहाणेच्या खेळीचे ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गज क्रिकेटपटूंनी केले कौतुक

पर्थ। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅप्टस स्टेडीयम, पर्थ येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पहिल्या डावात 7 बाद 252 धावा केल्या होत्या.

यामध्ये कर्णधार विराट कोहलीने 123 तर अजिंक्य रहाणेने 51 धावा केल्या. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. भारताने त्यांचे पहिले दोन विकेट्स आठ धावांवरच गमावले होते. त्याआधी कोहलीने चेतेश्वर पुजारा बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. पुजारा 24 धावा काढून बाद झाला.

कोहली आणि रहाणे या दोघांचा चौथ्या विकेट्सचा खेळ बघून ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क आणि डीन जोन्स यांनी त्यांचे चांगलेच कौतुक केले.

‘कोहली आणि रहाणेने संघाला ८ धावांवर २ विकेट्स असतानाच्या स्थितीतून उत्तमपणे वर काढले. अविश्वसनीय‘, असे ट्विट करत दोघांचे कौतुक केले आहे.

तसेच जोन्स यांनीही या दोघांचे कौतुक करण्यासाठी ट्विटरचा वापर केला. यामध्ये त्यांनी ‘खेळपट्टी बघता रहाणे आणि कोहली यांनी चांगला खेळ केला, असे ट्विट केले आहे.

आजच्या सामन्यात विराटचे त्याचे कसोटीतील 25वे शतक साजरे केले. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचे हे 7वे कसोटी शतक ठरले आहे.

तत्पुर्वी आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराह(2/53), इशांत शर्मा(4/41), हनुमा विहारी(2/53) आणि उमेश यादव(2/78) यांनी विकेट घेतल्या. तर पुढच्या डावात इशांत हॅट्ट्रीकवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबईकर अजिंक्य रहाणेने तो नकोसा विक्रम अखेर पुसून टाकला

विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना

जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?