चुकीला माफी नाही? मयांक अगरवालची त्या व्यक्तीने मागितली माफी

मेलबर्न। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 8 धावा केल्या आहेत. तसेच भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला आहे.

या सामन्यात पहिल्या दिवशी (26 डिसेंबर) भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करणाऱ्या मयांक अगरवालने 76 धावांची खेळी केली होती. पण या दिवशी तो फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू केरी कीफ यांनी अगवालच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

तसेच अगवालने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केलेली खेळी कॅटींनमधील कर्मचाऱ्यांच्या किंवा हाॅटेमध्ये काम करणाऱ्या वेटरसोबत केली असल्याचे  त्यांनी भाष्य केले होते. याबद्दल त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

त्यानंतर सध्या फॉक्स क्रिकेटसाठी समालोचन करत असलेले केरी कीफ यांनी माफी मागतली असून त्यांनी म्हटले आहे की ‘मी अगरवालच्या भारतात केलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या धावांबद्दल बोलत होतो. ज्यावर या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.’

‘मी कोणत्याही प्रकारे त्याच्या स्थराला कमी मानत नाही. त्याने बऱ्याच धावा केल्या आहेत. त्यामुळे कोणालाही वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो.’

केरी कीफ बरोबरच समालोचन कक्षात आलेल्या मार्क वाॅही मयांकवर अतिशय खराब टीपण्णी केली होती. त्याची प्रथम श्रेणीमधील सरासरी भारतात 50 आहे. जी ऑस्ट्रेलियाचा विचार करता जेमतेम 40 आहे. असे यावेळी मार्क वाॅ म्हणाला.

पण यावर स्पष्टीकरण देताना वॉ यांनी ट्विट केले आहे की ‘मी म्हणालो प्रथम श्रेणीमधील सरासरी भारतात 50 आहे. जी ऑस्ट्रेलियाचा विचार करता जेमतेम 40 आहे. कारण अनेक खेळाडूंनी ती सरासरी गाठली आहे. पण अगरवाल त्याच्या पहिल्याच डावात चांगली खेळी केली.’

भारताकडून ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पण करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अगवाल अव्वल स्थानी आहे.

मयांक अगरवालने 46 प्रथम श्रेणी सामन्यात 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत तर अ दर्जाच्या 75 सामन्यात 48.71च्या सरासरीने 3605 धावा त्याने केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

वाचा पहिला डाव घोषीत करण्याचा कोहलीचा निर्णय चूक की बरोबर

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा मुर्खपणा, म्हणे कोहलीने क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी

याला म्हणतात नशीब! रोहित शर्माबद्दल घडलेला हा किस्सा पहाच