केविन पीटरसन २०१९चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार !

इंग्लंडचा स्फोटक फलंदाज केविन पीटरसन लवकरच दक्षिण आफ्रिकेकडून खेळणार असल्याचं वृत्त आहे. केविन पीटरसनने talk sports शी बोलताना तो लवकरच आफ्रिकेकडून खेळणार असल्याचं भाष्य केलं आहे.

इंग्लंडचा हा माजी खेळाडू म्हणाला की त्याचा मूळ देश असणाऱ्या आफ्रिकेकडून तो २०१९ साली विश्वचषकात खेळण्यासाठी इच्छूक आहे. पीटरसन वर्षाच्या शेवटी आफ्रिकेकडून खेळण्यासाठी पात्र ठरणार आहे. पुढील दोन वर्ष केविन पीटरसन आपली कारकीर्द वाढवू इच्छित आहे.

पीटरसन म्हणाला, “मी आफ्रिकेतील ग्लोबल टी२० लीग पुढील दोन वर्ष खेळणार आहे. मी ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा दोन वर्ष खेळेल. पाकिस्तानमधील टी२० लीगमध्येही मी भाग घेणार आहे. ”

आपण आफ्रिकेत पुढील काही काळ राहणार असून लवकरच आफ्रिकेत एक घरही बांधणार असल्याचं पीटरसनने सांगितले आहे.

“मी आफ्रिकेकडून क्रिकेट खेळू शकतो, जे काही होईल त्यासाठी मी २०१९ पर्यंत वाट पाहिल. मी सध्या माझ्या टी२० संघाशी बांधील आहे. “, असाही केविन पीटरसन पुढे म्हणाला.

याबद्दलची अधिकृत न्युज ही ब्रिटिश क्रीडा पत्रकार पियर्स मॉर्गन यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केली.

 


पीटरसन इंग्लंडकडून १३६ एकदिवसीय सामने खेळला असून त्यात त्याने ४०.७३च्या सरासरीने ४४४० धावा केल्या आहेत. २०१९ च्या विश्वचषकावेळी त्याचे वय ३९वर्ष असेल. त्याने शेवटचं क्रिकेट २०१४ साली ऍशेस मालिकेच्या रूपाने खेळलं आहे.