टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा मोठा अपघात

भारताचे माजी क्रिकेटपटू जाकॉब मार्टिन यांचा 10-12 दिवसांपूर्वी दुचाकीवर जात असताना दुर्दैवाने आपघात झाला आहे. त्यांच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

मार्टीन हे बडोदा संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. तसेच त्यांनी बडोदा संघाचे नेतृत्वही केले आहे. ते भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण आणि युसुफ पठाण यांचे बडोदा संघातील पहिले कर्णधार होते.

सध्या रणजीमध्ये खेळत असलेल्या युसुफने मार्टिन यांच्या अपघाताबद्दल ट्विट करत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

 

युसुफने ट्विट केले आहे की, ‘भारताचे माजी क्रिकेटपटू आणि बडोदा संघाचे माजी प्रशिक्षक जाकॉब मार्टिन यांचा अपघात झाला आहे आणि ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. जाकॉब भाई तूमच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो.’

मार्टिन हे भारताकडून 2 वर्षात 10 वनडे सामने खेळले आहेत. यात त्यांनी 22.57 च्या सरासरीने 158 धावा केल्या आहेत.

त्यांनी 1998-99 च्या मोसमात बडोदाकडून 1000 पेक्षाही अधिक धावा काढल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी विंडीज विरुद्ध टोरोंटो येथे सप्टेंबर 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले होते.

त्यानंतर ते 2002-03 चा मोसम रेल्वेकडून खेळले पण यानंतर पून्हा ते बडोदा संघाकडे परतले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 138 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 46.65 च्या सरासरीने 9192 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

गिरे तो भी टांग उपर! ही काही सर्वोत्तम टीम इंडिया नाही, माजी खेळाडूची जोरदार टीका

विजयाच्या आनंदात शास्त्री- कोहलींकडून घडली मोठी चूक

हा फिरकीपटू असणार विश्वचषकात टीम इंडियाची पहिली पसंत