विराट कोहलीला वगळणे कितपत योग्य? माजी निवड समिती सदस्याचा सवाल

भारतीय संघ आपल्या एशिया कप मधील अभियानाची सुरुवात 18 सप्टेबरला हॉंगकॉंग विरूद्ध करणार असून त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सोबत सामना आहे. या स्पर्धेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

यावर भारतीय संघ निवड समितीचे माजी अध्यक्ष संदिप पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अति व्यस्त कार्यक्रमाचा खेळाडूंवर ताण येतो हे जरी खरे असले तरीही पांरपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात विराट कोहलीला दिलेली विश्रांती रुचत नाही.

भारत-पाकिस्तान यांचा सामना असल्यावर चाहते भावनिक दृष्ट्या गुंतलेले असतात. फक्त चाहते नाही तर खेळाडू आणि दोन्ही देशांचे बोर्ड अधिकरी देखील या मोठ्या सामन्याबद्दल उत्साह असतो, असे पाटील यांनी क्विंटसाठी लिहिले आहे.

बीसीसीआय कडून 30 खेळाडू तेवढ्याच कामासाठी करारबद्ध केले असताना विराट कोहलीलाच का अशी वागणूक दिली जाते. मी विराट कोहलीला दोष देत नाही पण माझा प्रश्न पुन्हा असा आहे की बीसीसीआयसाठी 30 पेक्षा अधिक खेळाडू करारबद्ध आहेत आणि त्यांना सर्वच सामन्यात खेळायला मिळते मग विराट कोहलीलाच का नाही ? कोहलीच्या अनुपस्थितीत रोहीत शर्माकडे भारताचे नेतृत्व असून त्याला फक्त कर्णधार म्हणूनच नव्हे तर वरिष्ठ खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करण्याचा दबाव असणार आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: मुशफिकूर रहिमचे दमदार शतक; बांगलादेशची विजयी सुरुवात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने घेतला यावर्षीचा सर्वात मोठा निर्णय

तमिम इक्बाल दुखापातीमुळे एशिया कपमधून बाहेर