पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना भारताला नमवण्याचा विश्वास

पाकिस्तान आणि भारत यांचा सामना आशिया चषकात 19 सप्टेंबर ला होणार आहे. त्याआधी दोन्ही संघ आपापले सामने हाँगकाँग सोबत अनुक्रमे 16 आणि 18 सप्टेंबरला खेळणार आहेत.

सामन्याला आता फक्त चार दिवस बाकी राहीले आहेत, त्यामुळे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांची तुलना होणे सहाजिकच आहे. सध्या पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय सामने होत नसल्याने त्यांचे बहुतेक सामने संयुक्त अरब अमिराती येथे होतात.

पाकिस्तान संघाला तेथील परिस्थितीचा सर्वात जास्त अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा पाकिस्तानच्या संघाला जास्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानची गोलंदाची ही त्यांची जमेची बाजू आहे. पाकिस्तानचे दोन माजी खेळाडू युनुस खान आणि आमेर सोहेल यांच्यामते जेव्हा 19 सप्टेंबरला दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील तेव्हा पाकिस्तानच सरस ठरेल.

पाकिस्तानकडे काही असे अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत जे नक्कीच भारताचा पराभव करू शकतील असा विश्वास सोहेल आणि युनुस खानला वाटतो. दोन्ही संघाची गाठ चॅम्पियन ट्राँफी 2017 फायनल मध्ये पडली होती त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी पराभव केला होता. पाकिस्तानचा संघ जर सकारात्मक वृत्तीने खेळला तर क्वोट्टा येथील सामन्यात भारताला हरवतील, असे युनुस खान म्हणाला.

पाकिस्तानचा माजी खेळाडू आमेर सोहेलला वाटते की पाकिस्तान संघासाठी येथील परिस्थिती सुसंगत आहे. या खेळपट्यांचा सर्वात जास्त अनुभव असण्याचा फायदा पाकिस्तानला  मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एशिया कप २०१८: एमएस धोनीच्या नावावर आहे हा खास विक्रम

शुटींग वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये भारताला शेवटच्या दिवशी तीन पदके

एशिया कप २०१८ स्पर्धेबद्दल सर्वकाही