सलमानची शिक्षा ऐकूण शोएब अख्तर कळवळला

बाॅलीवूड स्टार सलमान खान दिलेली शिक्षा ऐकून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने निराशा व्यक्त केली आहे. तसेच आपण न्यायदेवतेचा आदर करत असल्याचे वक्तव्यही केले आहे. 

शोएब अख्तरने खास ट्वीट करुन याबद्दल भाष्य केले आहे. 

‘माझा मित्र सलमान खानला झालेली ५ वर्षांची शिक्षा ऐकून खरंच खूप दु:ख झाले. परंतु कायद्याने त्याच काम केलं. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर आपण राखलाच पाहिजे. तरीही झालेली शिक्षा खूप कठोर आहे. मला त्याचे मित्र आणि कुटूंबाबद्दल वाईट वाटते. मला खात्री आहे की तो लवकरच सुटेल. ” असे शोएबने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला गुरूवारी शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर त्याला काल जामीन मिळणार होता परंतु त्याची सुनावणी आज होणार आहे.