श्रीलंकेचे दोन दिग्गज क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगच्या जाळ्यात?

श्रीलंकेचे क्रिकेट विश्वचषक विजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा हे दोन क्रिकेटपटू आहेत ज्यांच्या नावावर मॅच फिक्सिंगच्या तक्रारी प्रथम नोंदवल्या गेल्या आहेत.

याच्या खुलासा श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष तिलंगा सुमतिपाला यांनी नुकताच केला आहे.

अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा ह्या दोन क्रिकेटपटूंनी गुप्ता नाव्याच्या व्यक्तीकडून १५,००० डॉलर घेतल्याचा आरोप आहे, असे तिलंगा सुमतिपाला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यापूर्वी, गेल्या काही काळापासून श्रीलंकन क्रिकेट संघाच्या निराशाजन कामगिरीसाठी श्रीलंकन क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष तिलंगा सुमतिपाला यांना अर्जुन रणतुंगानी दोषी ठरवले होते.

तसेच  अर्जुन रणतुंगानी तिलंगा सुमतिपाला यांच्यावर सट्टेबाजीचा आरोपही केला होता.

मात्र तिलंगा सुमतिपालांनी अर्जुन रणतुंगांच्या या आरोपाचे खंडन केले आहे.

१९९० च्या दशकात अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे आधारस्तंभ होते. या दोघांनीही कित्येकवेळा श्रीलंकेला एकहाती विजय मिळवून दिले आहेत.

१९९६ साली अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने जबरदस्त कामगिरी करत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

‘हा’ कारनामा करण्याची धमक फक्त टीम इंडियातच आहे

पहिल्याच कसोटी सामन्यात आर अश्विनचा खास विक्रम