ऑस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक करणाऱ्या त्या ४ व्यक्तींना अटक !

गुवाहाटीमधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना भारता हरला आणि त्यानंतर भारतीय चाहत्यांनी ऑस्ट्रेलियाच्या बसवर दगडफेक केली. काल दगडफेक करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. आसामचे पोलिस महासंचालक मुकेश सहाय यांनी रविवारी ही माहिती दिली.

गुवाहाटीचे पोलिस आयुक्त हिरेन चंद्र नाथ यांनी सांगितले की, चार जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यातील दोन बारावीमधील विद्यार्थी आहेत तर दोन दुकानात काम करणारे आहेत.

“त्यांनी मद्यपान केले होते, मैदानाच्या जवळच्या परिसरातच त्यांनी मोबाईल फोनवर सामना पाहिला होता. भारतीय संघ हरल्यामुळे त्यांना राग आला आणि जेव्हा त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्टेडियममधून बाहेर येताना पाहिले तेव्हा त्यापैकी एकाने बसवर एक दगड फेकला आणि त्यांनी तेथून पळ काढला.” असे ते म्हणाले.

या घटनेनंतर पोलिसांनी दोन जणांना अटक केली होते पण या घटनेत त्यांचा सहभाग अद्याप सिद्धा झालेला नाही.

नाथ म्हणाले, “तपास सुरू आहे. जर आम्हाला आढळून आले की या आधी ज्या दोघांना अटक करण्यात आली होते, त्यांचा यात सहभाग नाही, मग आम्ही त्यांना सोडण्यासाठी न्यायालयात अर्ज करू.”

” राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला ही घटना कशी झाली याबद्दल चिंता होती, त्यामुळेच त्यांनी आम्हाला पूर्ण मदत केली आणि आता आम्हाला सुरक्षा व्यवस्था सुधारावी लागेल ज्यामूळे अश्या घटना पुन्हा घडणार नाहीत.” असे ही ते म्हणाले.