बारामती स्पोर्ट्स अकॅडमीच्या चार खेळाडूंची पुणे कबड्डी लीग साठी निवड.

बारामती: श्री शिव छत्रपती बालेवाडी स्टेडियम म्हाळुंगे पुणे येथे दिनांक १८ ते २१ मार्च दरम्यान महाराष्ट्र कब्बडी असोसिएशन व पुणे जिल्हा कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने पुणे कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

पुणे कब्बडी लीगसाठी बारामती येथील बारामती स्पोर्ट्स अकॅडमी च्या ४ खेळाडूंची निवड झाली आहे. सर्व खेळाडू प्रो कब्बडी खेळाडू दादासो आव्हाड यांच्या स्पोर्ट्स अकॅडमी बारामतीच्या वतीने चालणाऱ्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर सराव करीत आहेत.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा स्पोर्ट्स अकॅडमी बारामतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अकॅडमीचे आधारस्तंभ तहसीलदार हनुमंतराव पाटील, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, अकॅडमीचे सचिव अजिनाथ खाडे, उपाध्यक्ष संघर्ष गव्हाळे, संघ मार्गदर्शक मोहन कचरे, अक्षय खोमणे रविंद्र कराळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

निवड झालेल्या खेळाडूंचे बारामती बॅडमिंटन असोसिएशन, बारामती कराटे असोसिएशन व बारामतीच्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे व संघाची नावे पुढीलप्रमाणे:
१) दत्ता चव्हाण (बलाढ्य बारामती)
२) ऐश्वर्या झाडबुके (माय मुळशी)
३) साक्षी काळे (वेगवान पुणे )
४) वनिता गंभीरे (लय भारी पिंपरी चिंचवड)