पीएमडीटीए मानांकन टेनिस स्पर्धेत श्रेयश कलाटे, निशित रहाणे, अमोद सबनीस यांचे विजय

पुणे, २४ मे २०१७:  ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित आयकॉन प्रोजेक्ट  करंडक जिल्हा  मानांकन टेनिस स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रेयश कलाटे, निशित रहाणे, अमोद सबनीस या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आगेकूच केली.

महाराष्ट्र पोलीस (एमटी) टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात दुसऱ्या फेरीत निशित रहाणे याने सातव्या मानांकित चिन्मय काणेचा ६-२ असा सनसनाटी पराभव केला. अमोद सबनीस याने पाचव्या मानांकित यश पोळवर ६-२ असा दणदणीत विजय मिळवला. श्रेयश कलाटे याने सॊळाव्या मानांकित सेहज होराला ६-४ असे पराभूत केले. नवव्या मानांकित ओजस देशपांडेने आर्यन हुडला ६-४ असे नमविले.

८ वर्षाखालील मिश्र गटात शौर्य घोडगेने तेराव्या मानांकित नीरज जोरवेकरचा ५-३ असा तर, पाचव्या मानांकित रियान माळीने ह्रितीका डावलकरचा  ५-१ असा पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

८ वर्षाखालील मिश्र गट: दुसरी फेरी: समीहन देशमुख(१५)वि.वि.ओजस जोशी ५-१; मेहक कपूर(११)वि.वि.नील कोटीभास्कर ५-२; अमोघ दामले(७)वि.वि.वरद पोळ ५-३; शौर्य घोडगे वि.वि.नीरज जोरवेकर(१३)५-३;रियान माळी(५)वि.वि.ह्रितीका डावलकर ५-१;श्रीराम जोशी(६)वि.वि.आस्मि तुडेकर ५-२; नमिश हूड(१२)वि.वि.ईश्वरी कारेकर ५-०.

१० वर्षाखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी: उर्वी काटे(१)वि.वि.सिल्वा शुगा ५-०; क्षीरीन वाकलकर(५)वि.वि.गायत्री पाटील ५-०; काव्या देशमुख(४)वि.वि. सलोनी परिधा ५-२; तनिषा साने(७)वि.वि.सेईशा सिन्हा ५-२; मेहक कपूर(६)वि.वि.गार्गी मते ५-३; सिया प्रसादे(३)वि.वि.श्रावणी देशमुख ५-३; अनन्या ओरुगंती(८)वि.वि.गार्गी फलटणकर ५-०; देवांश्री प्रभुदेसाई(२)वि.वि.चरीशा सांगलीकर ५-०.

१४ वर्षाखालील मुले: दुसरी फेरी: सिद्धार्थ नेवलकर(१)वि.वि.आदित्य घाटगे ६-०; श्रेयश कलाटे वि.वि.सेहज होरा(१६)६-४; ओजस देशपांडे(९)वि.वि. आर्यन हूड ६-४; निशित रहाणे वि.वि.चिन्मय काणे(७)६-२; निनाद देसाई(३)वि.वि.अक्षय पाटील ६-०; जय शेलार(१३)वि.वि.मोक्ष सुगंधी ६-४; अनमोल नागपुरे वि.वि.सोहम थोरात ६-१; अमोद सबनीस वि.वि.यश पोळ(५)६-२; सार्थ बनसोडे(१०)वि.वि.ऋषिकेश जोशी ६-०.