16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत 14 मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का    

मुंबई | क्रिकेट क्लब ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित 13व्या रमेश देसाई मेमोरियल सीसीआय 16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात नैशा श्रीवास्तव, विधि जानी, श्वेता समंथा, कार्तिका विजय, रेश्मा मरूरी, लक्ष्मी अरूणकुमार,  अभया वेमुरी, भुमीका त्रिपाठी, सानिया मसंद यांनी, तर मुलांच्या गटात अनर्घ गांगुली, दिप मुनीम, अमन दहिया,अजय सिंग, दक्ष अगरवाल या खेळाडूंनी 14 मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत खळबळजनक निकालाची नोंद केली.
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 16वर्षाखालील मुलींच्या गटात कर्नाटकच्या नैशा श्रीवास्तव हिने दुसऱ्या मानांकित राजस्थानच्या रेनी सिंगचा 6-4, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. गुजरातच्या बिगरमानांकीत विधि जानीने चौथ्या मानांकित तेलंगणाच्या वेदा प्रापुर्णाचा 7-5, 6-1 असा पराभव केला. तामिळनाडूच्या पाचव्या मानांकित कार्तिका विजय हिने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित राधिका महाजनचे आव्हान 6-0, 6-0 असे सहज संपुष्टात आणले. पश्चिम बंगालच्या श्वेता समंथा हिने सहाव्या मानांकित महाराष्ट्राच्या सई भोयारचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: 16वर्षाखालील मुले:  
अनर्घ गांगुली(महाराष्ट्र) वि.वि हिरक वोरा(8)(गुजरात) 6-3, 6-3
दिप मुनीम(मध्यप्रदेश) वि.वि रिषी जलोटा(12)(चंदीगड) 6-1, 6-3
अमन दहिया(हरियाणा) वि.वि कार्तिक सक्सेना(10)(दिल्ली) 6-1, 6-2
अजय सिंग(चंदीगड) वि.वि तुषार मित्तल(15)(दिल्ली) 6-1, 6-0
दक्ष अगरवाल(महाराष्ट्र) वि.वि फैज नस्याम(11)(महाराष्ट्र) 6-3, 6-4 
आयुष्मान अर्जेरीया(मध्यप्रदेश) वि.वि करिम अलिम खान(महाराष्ट्र) 6-1, 6-4
यशराज दळवी(14)(महाराष्ट्र) वि.वि शिवम कदम(महाराष्ट्र)  6-2, 6-4
करण सिंग(9)(हरियाणा)वि.वि खुश शर्मा(उत्तरप्रदेश)  6-1, 6-1
भुषण हैबम(मणिपूर) वि.वि मोनिल लोटलीकर(कर्नाटक) 6-2, 7-5
धृव तंग्री(4)(पंजाब)वि.वि अग्रीय यादव(हरियाणा)  6-0, 6-0
अर्जून गोहड(महाराष्ट्र) वि.वि अधिरीत अवल(तामिळनाडू) 6-2, 6-2
साहेब सोधी(महाराष्ट्र) वि.वि कबीर छाब्रीया (कर्नाटक)  6-0, 6-2
कृष्णा हुडा(5)(चंदीगड) वि.वि दिवगुरजीत सिंग(पंजाब) 6-3, 6-2
डेनिम यादव(3)(मध्यप्रदेश) वि.वि सुखप्रीत झोजे(छत्तीसगड)  6-1, 6-3
निथिलन इरीक(16)(कर्नाटक) वि.वि निथिस बालाजी(तामिळनाडू)  7-5, 6-3
चिराग दुहान(2)(हरियाणा) वि.वि निखिल निरंजन(कर्नाटक)6-4, 6-2
 
दुसरी फेरी- 16वर्षाखालील मुली
नैशा श्रीवास्तव(कर्नाटक) वि.वि रेनी सिंग(2)(राजस्थान) 6-4, 6-2 
विधि जानी(गुजरात) वि.वि वेदा प्रापुर्णा(4)(तेलंगणा) 7-5, 6-1
श्वेता समंथा(पश्चिम बंगाल) वि.वि सई भोयार(6)(महाराष्ट्र) 6-2, 6-3
कार्तिका विजय(तामिळनाडू) वि.वि राधिका महाजन(5)(महाराष्ट्र) 6-0, 6-0
रेश्मा मरूरी(कर्नाटक) वि.वि ऋतूजा चाफळकर(3)(महाराष्ट्र) 6-2, 6-0
लक्ष्मी अरूणकुमार(तामिळनाडू) वि.वि मेखला मन्ना(12)(पश्चिम बंगाल) 6-1, 6-1
अभया वेमुरी(तेलंगणा) वि.वि सान्वी अहलुवालीया(13) (दिल्ली)  6-2, 6-2
भुमीका त्रिपाठी(महाराष्ट्र) वि.वि वैष्णवी अडकर(10) (महाराष्ट्र) 6-3, 7-5
सानिया मसंद(कर्नाटक) वि.वि.हृदया शहा(महाराष्ट्र)(9) 6-2, 7-5;
दिया भारव्दाज(गुजरात) वि.वि ईशिता जाधव(महाराष्ट्र) 6-1, 6-1