जेव्हा इशांत शर्माने एकाच ओव्हरमध्ये ६ नो बाॅल टाकले तेव्हा करत होते पंच काय?

भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सध्या सुरु असलेल्या आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. मात्र त्याच्यावर मागील काही काळापासून सतत नो बॉल टाकत असल्याची टीका होत होती. अशीच टीका त्याच्यावर अॅडलेड कसोटीनंतरही करण्यात आली आहे.

इशांतने आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शेवटच्या डावात अॅरॉन फिंचची पहिल्याच षटकात जवळजवळ विकेट घेतली होती. पण डीआरएस रिव्ह्यूमध्ये इशांतने तो नो बॉल टाकल्याचे लक्षात आले. त्यानंतर नॅथन लायनलाही त्याने बाद केले होते पण तोही चेंडू नो बॉल होता.

त्यामुळे इशांतवर बरीच टीका झाली होती. आॅस्ट्रेलियामधील डेली टेलिग्राफच्या एका वृत्ताप्रमाणे इशांतने पहिल्याच डावात 16 वेळा नो बॉल टाकले होते पण त्यातील पाचच नो बॉल लक्षात आले होते.

अॅडलेड कसोटीत नो बॉल टाकणारा इशांत एकमेव गोलंदाज होता. पण त्याच्या या नो बॉल भारताला मोठा फटका बसलेला नाही कारण भारताने या कसोटीत 31 धावांनी विजय मिळवला.

मात्र या सामन्यादरम्यान आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने समालोचन करताना म्हटले होते की एका षटकात इशांतने एका षटकात 4 नो बॉल टाकले आहेत. पण त्यातील एकही नो बॉल पंचाच्या लक्षात आलेला नाही.

यानंतर फॉक्स स्पोर्ट्सने याबद्दल शोध घेतला त्यावर त्यांनी म्हटले आहे की इशांतने अनेक नो बॉल टाकले आहेत. तसेच त्यांनी असेही सांगितले की एकाच षटकात त्याने 6 नो बॉल टाकले आहेत. पण हे मैदानावरील पंचाच्या लक्षातच आलेले नाही. म्हणजेच इशांतने पूर्ण षटकच नो बॉल टाकले होते.

इशांतने टाकलेल्या नो बॉलकडे पंचाच्या झालेल्या दुर्लक्षेबद्दल आॅस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डॅमिएन फ्लेमिंग आणि ब्रॅड हॉज यांनीही पंचावर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीने धावा केल्या ८२ परंतु विक्रम केला १६१ वर्ष जूना

मुंबई इंडियन्सच्या हार्दिक पंड्याची मुंबईविरुद्धच वानखेडेवर जोरदार कामगिरी

लग्न झाले सायना-कश्यपचे, मास्टर ब्लास्टरने शुभेच्छा दिल्या किदांबी-सायनाला

मुरली विजय- केएल राहुल टीम इंडियासाठी खरोखर फीट आहेत का?