फिफा प्रो २०१८ एकादश संघाच्या मानांकनात फ्रान्स, स्पेनचे वर्चस्व

फिफा प्रो 2018च्या एकादश संघात घोषणा केलेल्या 55 फुटबॉलपटूंमध्ये विजेत्या फ्रान्सचे आठ तर स्पेनच्या सात खेळाडूंचे नाव असल्याने या दोन संघाचे वर्चस्व दिसून येत आहे.

मागच्या वर्षीच्या अकरा पैकी क्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लियोनल मेस्सी या स्टार फुटबॉलपटूंचाही यात समावेश आहे. तसेच रियल माद्रीदच्या अकरा फुटबॉलपटूंचाही यात समावेश आहे.

फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहचलेल्या इंग्लंड संघाचे तीन यामध्ये खेळाडू आहेत. यात टोटेनहॅम हॉट्स्परचे हॅरी केन आणि कायरन ट्रीपर तर मॅंचेस्टर सिटीचा कायले वॉल्कर यांचा समावेश आहे.

तसेच लीव्हरपूलचा मोहमद सलाह आणि सादियो मॅने हे दोन आफ्रिकेचे फुटबॉलपटूंची नावे घोषित झाली आहेत. रियल माद्रीदचा गॅरेथ बॅले याने चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात दोन गोल करून संघाला विजेतेपद मिळवून दिले होते त्याचे नाव या यादीत नाही आहे.

तब्बल 65 देशांतून 25000 फुटबॉलपटूने केलेल्या मतदानांमधून विजेते निवडणार असून त्याची घोषणा 24 सप्टेंबरला होणाऱ्या द बेस्ट फिफा फुटबॉलच्या पुरस्कारात केली जाणार आहे.

यांमधून निवडले जाणार उत्कृष्ठ अकरा फिफा 2017-18चे फुटबॉलपटू-

गोलकिपर-  जॅल्युइजी बुफॉन (इटली/पॅरीस सेंट-जर्मन/जुवेंटस), थिबाऊ कोर्टीस (बेल्जियम/रियल माद्रीद/चेल्सी), डेव्हीड द गी (स्पेन/मॅंचेस्टर युनायटेड), केलॉर नॅवस (कोस्टा रिका/रियल माद्रीद), मार्क-आंद्रे टेर स्टेजन (जर्मनी/बार्सिलोना)

डिफेंडर्स-  जॉर्डी अल्बा (स्पेन/बार्सिलोना), डॅनियल कार्वाहल (स्पेन/रियल माद्रीद), जॉर्जो केल्हीनी (इटली/जुवेंटस), डॅनी अलव्हेस (ब्राझिल/पॅरीस सेंट-जर्मन), दिएगो गोडीन (उरुग्वे/अॅटलेटीको माद्रीद), मॅट्स हमल्स (जर्मनी/बायर्न म्युनिच), जोशुआ किमिच (जर्मनी/बायर्न म्युनिच), देजान लोव्हरेन ( क्रोएशिया/लीव्हरपूल), मार्सेलो (ब्राझिल/रियल माद्रीद), येरे मिना (कोलंबिया/एव्हरटन बार्सिलोना), बेंझामिन पॅवार्ड (फ्रान्स/स्टुटगर्ट), जेरार्ड पीके (स्पेन/बार्सिलोना), सरियो रॅमोस (स्पेन/रियल माद्रीद), थियागो सिल्व्हा (ब्राझिल/पॅरीस सेंट-जर्मन), कायरन ट्रीपर (इंग्लंड/टोटेनहॅम हॉट्स्पर), सॅम्युयल उमतीती (फ्रान्स/बार्सिलोना), वरजिल वन डेक (नेदरलॅंड/लीव्हरपूल), राफेल वॅरने (फ्रान्स/रियल माद्रीद), शीमे वर्सालको (क्रोएशिया/इंटर मिलान/अॅटलेटिको माद्रीद), कायले वॉल्कर (इंग्लंड/मॅंचेस्टर सिटी)

मिडफिल्डर्स-  सरियो बोस्केट (स्पेन/बार्सिलोना), कॅसेमिरो (ब्राझिल/रियल माद्रीद), फिलीप काउटीन्हो (ब्राझिल/बार्सिलोना), केवीन द ब्रुने (बेल्जियम/मॅंचेस्टर सिटी), एडन हॅजार्ड (बेल्जियम/चेल्सी), आंद्रेस इनियेस्टा (स्पेन/विसेल कोब/बार्सिलोना), इस्को (स्पेन/रियल माद्रीद), एनगोलो कांटे (फ्रान्स/चेल्सी), नेमांजा मॅटीच (सर्बिया/मॅंचेस्टर युनायटेड), लुका मोड्रीच (क्रोएशिया/रियल माद्रीद), पॉल पोग्बा (फ्रान्स/मॅंचेस्टर युनायटेड), इवान रॅकीटीच (क्रोएशिया/बार्सिलोना), डेव्हीड सिल्व्हा (स्पेन/मॅंचेस्टर सिटी), अरत्युरो विदान (चीली/बार्सिलोना/बायर्न म्युनिच)

फॉरवर्ड्स-  करिम बेनझेमा (फ्रान्स/रियल माद्रीद),एडीसन कवानी (उरुग्वे/पॅरीस सेंट-जर्मन), क्रिस्तीयानो रोनाल्डो (पोर्तुगल/जुवेंटस/रियल माद्रीद), पॉलो डॅबला (अर्जेंटीना/जुवेंटस), अॅंटोनी ग्रीजमन (फ्रान्स/अटलेटिको माद्रीद), हॅरी केन (इंग्लंड/टोटेनहॅम हॉट्स्पर), रॉबर्ट लेवानडोस्की (पोलंड/बायर्न म्युनिच), रोमेलू लुकाकू (बेल्जियम/मॅंचेस्टर युनायटेड), मारियो मॅंडझुकीक (क्रोएशिया/ जुवेंटस), सादियो मॅने (सेनेगल/लीव्हरपूल), कायलिन एमबाप्पे (फ्रान्स/ पॅरीस सेंट-जर्मन), लियोनल मेस्सी (अर्जेंटीना/बार्सिलोना), नेमार (ब्राझिल/पॅरीस सेंट-जर्मन), मोहमद सलाह (इजिप्त/लीव्हरपूल), लुइस सुवारेज (उरुग्वे/ बार्सिलोना)

महत्त्वाच्या बातम्या:

टॉप ५: शेवटच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या अॅलिस्टर कूकने केले हे खास विक्रम

Video: हनुमा विहारी केला क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधर यांच्याबरोबर असलेल्या खास नात्याचा खुलासा

युएस ओपन २०१८: उपविजेत्या सेरेना विल्यम्सला झाला १२ लाखांचा दंड!