मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही आहे निराशाजनक बातमी

आयपीएलचा हा 12वा हंगाम असून तो भारतातच होणार आहे हे आता निश्चित झाले आहे. 23 मार्चपासून याला सुरूवात होणार आहे.

यावेळी संघांना फक्त तीनच सामने घरच्या मैदानावर खेेळता येणार आहेत तर बाकीचे सामने  दुसरीकडे हलवले जाण्याची शक्यता आहे असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. असे मुंबई मिररमधील एका रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. या बदलाला संघाच्या फ्रॅंचायजींनी होकार दिला आहे. यावेळी आयपीएलच्या सामन्यांसाठी बीसीसीआयने पाच ते सहा तठस्थ ठिकाणे ठरवली आहेत.

यामुळे यावेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जास्तीत जास्त ३ आयपीएल सामने होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची मात्र मोठी निराशा होणार आहे.

“आयपीएलच्या वेळी भारतात लोकसभेच्या निवडणुका होत असल्याने त्यांच्या तारखा स्पष्ट झाल्यावर आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. ते पुढील महिन्यापर्यंत ठरवले जाणार आहे”, असे बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, आयपीएलचे वेळापत्रक 2 किंवा 3 फेब्रुवारी पर्यंत तयार होईल. यासाठी बीसीसीआयने सामन्यांचे ठिकाण हलवण्याची तयारी दर्शवली आहे. बीसीसीआयने फ्रॅंचायजींना याबद्दल आधीच कल्पना दिली आहे.

“भारतातच आयपीएल ठेवण्याचा आमचा पहिला प्रयत्न होता. जर निवडणुका आणि सामन्यांच्या तारखा सारख्याच असल्या तर सामन्यांचे ठिकाण बदल्याची काळजी आम्ही घेतली आहे. ज्या ठिकाणी सामने होणार आहे तेथे संघांना सुरक्षा देण्यात येईल”, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी टाइम्स नाऊला सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित शर्माकडून बेबी सिटिंगसाठी रिषभ पंतला विचारणा

८ सामन्यात तब्बल ६८ विकेट घेत या गोलंदाजाने माेडला ४४ वर्ष जूना विक्रम

कॉफी विथ करन हार्दिक पंड्या, केएल राहुलला पडले महागात…