नदाल एटीपी क्रमवारीत २रा

फ्रेंच ओपन चॅम्पियन राफेल नदालला २ क्रमांकांचा फायदा होऊन तो एटीपी क्रमवारीत दुसरा आला आहे. फ्रेंच ओपन पूर्वी तो ४थ्या स्थानावर होता. एटीपीने सोमवारी घोषित केलेल्या क्रमवारीत नदाल ऑक्टोबर २०१४ पासून प्रथमच या क्रमवारीत एवढ्या वरच्या स्थानावर आला आहे.

नोवाक जोकोविचची दुसऱ्या स्थानावरून ४थ्या स्थानी घसरण झाली असून गेल्या ७वर्षातील ही त्याची सर्वात खराब क्रमवारी आहे. तो फ्रेंच ओपनमध्ये उपांत्यफेरीत पराभूत झाला आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपेनचेच विजेतेपद जिंकून त्याने करिअर ग्रँडस्लॅम पूर्ण केले होते.

अँडी मरेने पुन्हा जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक मिळविला असून त्याला उपांत्यफेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. स्टॅन वावरिंका क्रमवारीत ३ऱ्या स्थानी कायम असून त्याला ६-२, ६-३, ६-१ असा तो फ्रेंच ओपन अंतिम फेरीत पराभूत झाला.

सलग दुसऱ्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये भाग न घेतलेल्या रॉजर फेडररने तरीही आपले ५वे स्थान टिकून ठेवले आहे.