राफेल नदालच ठरला फ्रेंच ओपनचा बादशहा

अव्वल मानांकित राफेल नदालने आज पुन्हा एकदा तो क्ले कोर्टचा बादशहा असल्याचे सिद्ध केले आहे. नदालने आज ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचा 6-4 6-3 6-2 असा पराभव करत ऐतिहासिक 11 वे फ्रेंच ओपेनचे विजेतेपद जिंकले.

आज थिमने नदालला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, परंतु नदालाचा अनुभव या सामन्यात महत्वाचा ठरला.

याबरोबरच नदालचे हे कारकिर्दीतील एकूण 17 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद ठरले आहे. तसेच या विजेतेपदाबरोबरच नादलाने अनेक विक्रमही केले आहेत.

एकच ग्रँडस्लॅम 11वेळा जिंकणारा नदाल हा केवळ दुसराच खेळाडू ठरला आहे .याआधी मार्गारेट कोर्ट हिने 1960 ते 1973 मध्ये 11 ऑस्ट्रेलियन ओपेनचे विजेतेपद मिळवले आहे.

राफेल नदालने आजपर्यंत फ्रेंच ओपन स्पर्धेत १४वेळा भाग घेतला असुन त्यात 11 वेळा विजेतेपदं जिंकले आहे. त्याने येथे 86सामने जिंकले आहेत तर केवळ 2पराभवाला सामोरे गेला आहे. राफेल नदाल कधीही अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेत पराभूत झालेला नाही.

नदालच्या या विजेतेपदाबरोबर केलेले काही विक्रम

-17 ग्रॅंडस्लॅम पैकी नदालच्या विजेतेपदांची विभागणी
11- फ्रेंच ओपन
3- युएस ओपन
2- विंबल्डन
1- आॅस्ट्रेलियन ओपन

-एकाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदं जिंकणारे पुरुष खेळाडू
11- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
8- राॅजर फेडरर, विंबल्डन
7- पीट सॅंप्रास, विंबल्डन
6- बियाॅन बोर्ग, फ्रेंच ओपन
6- राॅजर फेडरर, आॅस्ट्रेलियन ओपन
6-नोवाक जोकोविच, आॅस्टेलियन ओपन

-एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदं जिंकणारे खेळाडू
11- मार्गारेट कोर्ट, आॅस्ट्रेलियन ओपन
11- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
9- मार्टिना नवरातिलोवा, विंबल्डन

-एकाच ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सर्वाधिक विजय मिळवणारे खेळाडू
98- जिमी काॅनोर्स, युएस ओपन
94- राॅजर फेडरर, आॅस्ट्रेलियन ओपन
91- राॅजर फेडरर, विंबल्डन
86- राफेल नदाल, फ्रेंच ओपन
84- जिमी काॅनोर्स, विंबल्डन

-सर्वाधिक वेळा फ्रेंच ओपन जिंकणारे खेळाडू
11- राफेल नदाल
8- मॅक्स डेकोजिस
6- बियाॅन बोर्ग

-सर्वाधिक वेळा ग्रॅंडस्लॅम जिंकणारे खेळाडू
20- राॅजर फेडरर
17- राफेल नदाल
14- पीट सॅंप्रास
12- राॅय इमर्सन
12- नोवाक जोकोविच