अमेरिकन ओपनच्या विजेत्या आणि उपविजेत्या आज फ्रेंच ओपनमध्ये आमने-सामने

2017 अमेरीकन ओपन स्पर्धेची विजेती स्लोनी स्टीफन्स आणि मेडिसन की यांच्यात आज फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे.

उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात स्लोनी स्टीफन्सने 14 व्या मानंकीत दारीया कसात्कीनाचा 6-3, 6-1 अशा फरकाने पराभव करत पहिल्यांदाच फ्रेंच ओपनची उपांत्यफेरी गाठली आहे.

अमेरीकेच्या मेडीसन कीने उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात बिगर मानंकीत युलिया पुतिनेस्तेवाचा 7-6(5), 6-4 अशा फरकाने पराभव करून फ्रेंच ओपनची पहिली उपांत्य फेरी गाठली. मेडीसन की या वर्षीच्या फ्रेंच ओपनमधे एकही सेट हारलेली नाही.

याआधी 2017 अमेरीकन ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्लोनी स्टीफन्स आणि मेडिसन की यांचा सामना झाला होता. या सामन्यात स्लोनी स्टीफन्सने मेडिसन की चा 6-3, 6-0  असा पराभव करत विजेतेपद पटकावले होते. हे तीचे पहिले ग्रॅन्ड स्लॅम विजेतेपद होते.

त्यामुळे पुन्हा एकदा या दोघी एकमेकींसमोर आव्हान उभ्या करताना पहायला मिळणार आहे.