बीसीसीआयने प्रकाशित केले क्रिकेटर्ससाठी खास हँडबुक

बीसीसीआयकडून आज आपल्या सर्व खेळाडूंसाठी एक नवीन पुस्तक प्रकाशीत करण्यात आले आहे. हे पुस्तक एक विशेष हँडबुक आहे ज्यात अनेक गोष्टींचा लेखा जोखा मांडला आहे.

क्रिकेटर्सला खेळापासून ते खेळामुळे येणाऱ्या तणावापर्यंत तर त्यातून मिळणाऱ्या पैसा या सर्व गोष्टींना कसे सामोरे जायचे हे या पुस्तकात मांडल्या आहेत. सर्व क्रिकेटर्स या पुस्तकाचा लाभ घेता येणार आहे.

बीसीसीआयने आज या पुस्तकाचे औपचारिक उद्घाटन केले. ‘१०० थिंग्स एव्हरी प्रोफेशनल क्रिकेटर मस्ट नो’ असे नाव असलेल्या या पुस्तकाची प्रस्तावना भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज राहुल द्रविडने लिहली आहे. हे पुस्तक बीसीसीआय बरोबर करारबद्ध असलेल्या सर्व क्रिकेटपटूंसाठी उपलब्ध असणार आहे. या पुस्तकात खेळाडूंसाठी येणाऱ्या रकमेच्या व्यवस्थापनापासून ते अगदी दुखापतीला कसे सामोरे जायचे असे १० विभाग आहेत.

हे २१२ पानी पुस्तक बीसीसीआयने प्रथमच प्रकाशित केले आहे. राहुल द्रविड यावेळी बोलताना म्हणाला, “पुस्तक वेळोवेळी संदर्भ म्हणून वापरण्यासाठी उत्तम आहे. अनेक विषय यात चांगल्या पद्धतीने मांडले आहेत ज्यामुळे नवोदित आणि तरुण खेळडूंना याचा चांगला फायदा होईल.”