प्रो कबड्डी: सर्व कर्णधारांची नावे घोषित, पहा संपूर्ण यादी

प्रो कबड्डीच्या या मोसमातील चुरस, उत्सुकता आणि चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही. प्रो कबड्डीमधील संघानी खेळाडू निवडून बरेच दिवस झाले होते पण काही संघानी त्यांचे कर्णधार निवडले नव्हते.

आपला संघ चर्चेत रहावा म्हणून स्पर्धेला बोटावर मोजण्या इतके दिवस बाकी असताना दबंग दिल्ली आणि हरियाणा स्टीलर्स संघांनी २४ जुलै रोजी आपले कर्णधार घोषित केले तर युपी योद्धाजने काल २५ जुलै रोजी त्यांचा कर्णधार म्हणून स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू नीतीन तोमर याचे नाव घोषित केले.

स्पर्धेला अवघे तीन दिवस बाकी असताना सर्व संघांच्या कर्णधारांची नावे घोषित झाली.

ही प्रो कबड्डी संघातील सर्व संघांच्या कर्णधारांची यादी
१ पुणेरी पलटण- दीपक निवास हुड्डा
२ तेलगू टायटन्स- राहुल चौधरी
३ तमील थालयवाज- अजय ठाकूर
४ हरयाणा स्टीलर्स- सुरिंदर नाडा
५ गुजरात फॉर्च्युनजायन्ट्स- सुकेश हेगडे
६ युपी योद्धाज- नितीन तोमर
७ जयपूर पिंक पँथर- मंजीत चिल्लर
८ पाटणा पायरेट्स- प्रदीप नारवाल
९ बेंगाल वॉरियर्स-  सुरजीत सिंग
१० दबंग दिल्ली- मिराज शेख
११ बेंगलूरु बुल्स- रोहित कुमार
१२ यु मुंबा- अनुप कुमार