राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होणाऱ्या उपांत्य आणि अंतिम फेरीचे वेळापत्रक

हैद्राबाद । गेले ५ दिवस सुरु असलेल्या ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. कधी नाही ते पहिल्यांदा या राष्ट्रीय स्पर्धेची एवढी मोठी चर्चा झाली. पहिल्यांदाच ही स्पर्धा प्रेक्षकांच्या आग्रहाखातर थेट प्रक्षेपित करण्यात आली. हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे ही स्पर्धा अतिशय थाटामाटात पार पडत आहे.

महाराष्ट्राच्या महिलांच्या संघाला जरी अंतिम ४ संघात स्थान मिळवण्यात अपयश आले असले तरी पुरुषांच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस असून महिला आणि पुरुष संघांचे असे मिळून ६ सामने होणार आहे.

महिलांच्या उपांत्यफेरीचे सामने सकाळी १० आणि ११ वाजता तर अंतिम सामना दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. पुरुषांचा उपांत्यफेरीचे सामने संध्याकाळी ५ वाजून ४५ आणि ६ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे.

महिला गटाचा अंतिम सामना दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी तर पुरुषांचा अंतिम सामना रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी होणार आहे.

असे असेल वेळापत्रक:
महिला गट:
उपांत्य फेरीचा सामना १: रेल्वे विरुद्ध पंजाब, सकाळी १० वाजता
उपांत्य फेरीचा सामना २: हरियाणा विरुद्ध हिमाचल प्रदेश, सकाळी ११ वाजता
अंतिम सामना: उपांत्य फेरी विजेता १ विरुद्ध उपांत्य फेरी विजेता २, दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी

पुरुष गट:
उपांत्य फेरीचा सामना १: कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र, संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी
उपांत्य फेरीचा सामना २: हरियाणा विरुद्ध सेनादल, संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी
अंतिम सामना: उपांत्य फेरी विजेता १ विरुद्ध उपांत्य फेरी विजेता २, रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी