असा असेल श्रीलंकेचा भारत दौरा !

तिन्ही फॉरमॅटचे तीन-तीन सामने होणार.

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यांनंतर न्यूजीलँड संघाबरोबर मालिका खेळणार आहे. ती मालिका संपताच श्रीलंका संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका संघ ३ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. भारताने श्रीलंकेत जाऊन वनडे, टी-२० आणि कसोटी तिन्हीमध्ये निर्भेळ यश मिळवले होते. आता घरच्या मैदानावर खेळतानाही भारत अशीच काहीशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल.

दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. पहिला कसोटी सामना ऐतिहासिक इडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. पुढील दोन कसोटी सामने नागपूर आणि दिल्लीमध्ये होणार आहे. कसोटी आणि वनडे मालिकेमध्ये खेळाडूंना फक्त ४ दिवसाची सुट्टी मिळणार आहे. ६ डिसेंबरला कसोटी मालिका संपल्यानंतर लगेचच १० तारखेपासून वनडे मालिका चालू होणार आहे.

पहिला वनडे सामना धर्मशालाच्या सुंदर मैदानावर खेळला जाणार आहे. बाकी दोन वनडे सामने मोहाली आणि विशाखापट्टणमला खेळले जाणार आहेत. टी-२० मालिकेतील सामने २०, २२ आणि २४ तारखेला कटक, इंदोर आणि मुंबई या मैदानावर होणार आहेत.

२०१७ श्रीलंकेच्या-भारत दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक !

पहिली कसोटी: १६-२० नोव्हेंबर, ईडन गार्डन्स, कोलकाता

दुसरी कसोटी: २४-२८ नोव्हेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर

तिसरी कसोटी: २-६ डिसेंबर, फिरोज शाह कोटला मैदान, दिल्ली

पहिला एकदिवसीय सामना: १० डिसेंबर हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला.

दुसरा एकदिवसीय सामना: १३ डिसेंबर पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहाली मधील आयएस बिंद्रा स्टेडियम.

तिसरी एकदिवसीय सामना: १७ डिसेंबर डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी, एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम.

पहिली टी-२० : २० डिसेंबर कटक बाराबाटी स्टेडियम.

दुसरी टी-२० : २२ डिसेंबर इंदौर होळकर स्टेडियम.

तिसरी टी-२० : २४ डिसेंबर मुंबई वानखेडे स्टेडियमवर.