प्रो कबड्डी: असे होणार प्ले-ऑफचे सामने

पुणे । आज पुण्यातील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, बालेवाडी येथे प्रो-कबड्डी २०१७चा शेवटचा साखळी सामना झाला.

अगदी शेवटच्या रेडपर्यंत ताणलेली उत्सुकता आणि त्यातील घरचा संघ असल्यामुळे मिळत असलेला पाठिंबा यातही गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने पुणेरी पलटण संघावर २३-२२ असा विजय मिळवत अ गटात अव्वल स्थान मिळवले आणि प्ले- ऑफ लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

अ गटात अव्वल स्थानी गुजरात फॉर्च्युनजायंट्स राहिला असून दुसऱ्या स्थानावर पुणेरी पलटण तर तिसऱ्या स्थानी हरयाणा स्टीलर्स संघ राहिला. तर ब गटात बेंगाल वॉरियर्स अव्वल, पाटणा पायरेट्स दुसरा तर युपी योद्धा तिसरा संघ राहिला.

प्ले-ऑफ च्या लढती २३ ऑक्टोबरपासून मुंबई येथे होणार असून या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक असे-

एलिमिनेटर १-
पुणेरी पलटण विरुद्ध युपी योद्गा, २३ ऑक्टोबर २०१७, ८:०० वाजता, मुंबई

एलिमिनेटर २-
पाटणा पायरेट्स विरुद्ध हरयाणा स्टीलर्स , २३ ऑक्टोबर २०१७, ९:०० वाजता, मुंबई

क्वालिफायर १-
गुजरात फॉर्च्युनजायंट्स विरुद्ध बेंगाल वॉरियर्स, २४ ऑक्टोबर २०१७, ८:०० वाजता, मुंबई

एलिमिनेटर ३-
एलिमिनेटर १ विजेता विरुद्ध एलिमिनेटर २ विजेता , २४ ऑक्टोबर २०१७, ९:०० वाजता, मुंबई

क्वालिफायर २-
पराभूत क्वालिफायर १ विरुद्ध एलिमिनेटर ३ विजेता, २६ ऑक्टोबर २०१७, ८:०० वाजता, चेन्नई

अंतिम सामना
क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता, २८ ऑक्टोबर २०१७, ८:०० वाजता, चेन्नई