संपुर्ण वेळापत्रक: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अशी रंगणार वनडे मालिका

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.

या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद रोहित शर्मा सांभाळेल. तसेच या मालिकेत भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे.

या मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही समावेश करण्यात आला आहे.

त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये झालेल्या एशिया कपमध्ये दुखापतीला सामोरे जावे लागलेल्या हार्दिक पंड्या आणि केदार जाधवचेही भारताच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत वनडे मालिकेचे वेळापत्रक – 

पहिला वनडे – 12 जानेवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंड – सकाळी – 7.50 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

दुसरा वनडे – 15 जानेवारी, अॅडलेड ओव्हल – सकाळी – 8.50 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

तिसरा वनडे – 18 जानेवारी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड – सकाळी -7.50 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियावर चिडले चाहते, असा केला राग व्यक्त

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमधून बाहेर?

या कारणामुळे इशांत शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर