संपूर्ण वेळापत्रक: असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारतीय संघ या वर्षात जवळ जवळ सर्व परदेश दौरेच करणार आहे. यात डिसेंबरमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित झाला आहे. त्याचे वेळापत्रक आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. 

या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी20, चार कसोटी आणि तीन वनडेचे सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होईल. या मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनच्या गॅबा स्टेडियमवर 21  नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. 

त्यानंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. कसोटी मालिकेची सुरुवात 6 डिसेंबरपासून होणार आहे. 6-10 डिसेंबरदरम्यान अॅडलेड ओवल स्टेडियमवर होणारा पहिला कसोटी सामना दिवस रात्र खेळवण्याचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा विचार आहे. 

पण याला बीसीसीआयचा विरोध आहे. यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड म्हणाले ते बीसीसीआय बरोबर दिवस रात्र कसोटीसाठी वाटाघाटी करतील. 

त्यामुळे आता बीसीसीआय यावर काय निर्णय देते हे पहावे लागेल. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 12 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळेल. 

असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: 

टी20 मालिका: 

पहिला टी20 सामना: 21 नोव्हेंबर,  गॅबा

दुसरा टी20 सामना: 23 नोव्हेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड

तिसरा टी20 सामना: 25 नोव्हेंबर, सिडनी क्रिकेट ग्राउंड 

 

कसोटी मालिका: 

पहिली कसोटी: 6- 10 डिसेंबर, अॅडलेड ओवल

दुसरी कसोटी : 14-18 डिसेंबर, पर्थ स्टेडियम  

तिसरी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड

चौथी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंड 

वनडे मालिका: 

पहिली वनडे: 12 जानेवारी,  सिडनी क्रिकेट ग्राउंड 

दुसरी वनडे: 15 जानेवारी, अॅडलेड ओवल

तिसरी वनडे: 18 जानेवारी, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड