Full Timetable: असे आहेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांचे आजचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील सामने

साखळी फेरीत सर्वच सामने जिंकून महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश केला. आज महाराष्ट्राच्या या दोन्ही संघांचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आहेत.

पुरुषांच्या संघाचा सामना:
महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाने साखळी फेरीत ‘क’ गटात मोठी कामगिरी करताना ३ पैकी ३ लढती जिंकल्या. त्यामुळे संघ गटात अव्वल स्थानी आला. यामुळे क गटातील विजेता असलेला महाराष्ट्र ‘फ’ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाशी अर्थात दिल्ली संघाशी आज लढणार आहे. हा सामना आज संध्याकाळी ४ वाजता वेळापत्रकानुसार होणे अपेक्षित आहे.

महिलांच्या संघाचा सामना:
पुरुषांच्या संघाप्रमाणेच काल महिलांच्या संघानेही साखळी फेरीत ३ संघाना धूळ चारत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यामुळे हा संघ ‘ड’ गटात अव्वल स्थानी आला. ‘ड’ गटात अव्वल असणारा संघ अपेक्षेप्रमाणे ‘इ’ गटात दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघाशी दोन हात करणार आहे. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या महिलांचा सामना वेळापत्रकानुसार ११ वाजून १५ मिनिटांनी बंगालच्या संघाशी होणार आहे.

अन्य उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे वेळापत्रक