जाणून घ्या जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमबद्दल

क्रिकेट हळूहळू आफ्रिकन देशात प्रवेश करू लागले आहे आणि त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियम अर्थात द गहांगा इंटरनॅशनल स्टेडियम.

रवांडा देशाच्या राजधानीपासून काही अंतरावर असणाऱ्या गहांगा उपनगरात हे सुंदर स्टेडियम भरण्यात आले आहे.

या मैदानाचे उदघाटन २८ ऑक्टोबर रोजी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्स आणि इंग्लंडचा क्रिकेटपटू सॅम बिल्लीन्ग्स यांच्या हस्ते झाले.

या मैदानाचा पॅव्हिलिअन हा उसळत्या चेंडूप्रमाणे आहे. हे मैदान रवांडा क्रिकेट स्टेडियम फॉउंडेशनने उभारले असून याची उंची १२४ मीटर तर रुंदी १३७ मीटर आहे.

“संपूर्ण स्टेडियम हे २ हेक्टर जागेवर बांधले असून उरलेल्या २.५ हेक्टरवर भविष्यात सुविधा उभारल्या जातील. या मैदानासाठी संपूर्ण पैसा हा जगातील क्रिकेटप्रेमींकडून उभारण्यात आला आहे आणि भविष्यात येथे सामने होणार आहे. ” असे रवांडा क्रिकेट स्टेडियम फॉउंडेशनचे एरिक दूसिंगिझिमणा द न्यू टाइम्सशी बोलताना म्हणाले.