गजानन कीर्तिकरांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष पदी निवड

गजानन कीर्तिकर व मंगल पांडे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष पदी निवड. इतर पदांची निवड ही बिनविरोध झाली होती. आज दि.२५नोव्हेंबर रोजी झालेल्या या दोन पदांकरिता निवडणूक घेण्यात आली.
कार्याध्यक्षच्या पदाकरिता मुंबई उपनगरचे कबड्डी असो.चे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर व औरंगाबाद कबड्डी असो.चे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथरीकर यांच्यात तर कोषाध्यक्ष पदाकरिता परभणी जिल्हा कबड्डी असो.चे कार्यवाह मंगल पांडे व कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडीगिरी यांच्यात सरळ लढत होती.
आज महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदासाठी मुख्यालयात निवडणूक पार पडली. मी स्वत: ही निवडणूक लढवून ५१-१९ अशा मतांच्या फरकाने विजयी झालो.
मला या निवडणुकीत मतदान करणाऱ्या सर्व मतदार, मदत करणारे ज्ञात-अज्ञात सहकारी-हितचिंतकांचे मी कृतज्ञपणे आभार व्यक्त करतो. pic.twitter.com/sWjXulV7eJ
— Gajanan Kirtikar (@GajananKirtikar) November 25, 2018
या मतदानासाठी २५संलग्न जिल्ह्याचे ७४ प्रतिनिधी पात्र ठरले होते. त्यापैकी ७१ सदस्यांनी मतदान केले. गजानन कीर्तिकर यांना ५१ मते मिळाली, तर दत्ताभाऊ पाथरीकर यांना १९ मते मिळाली. एक मत बाद झाले. ३२ मतांनी कीर्तिकर कार्याध्यक्षपदी निवडून आले.
मंगल पांडे यांना ४७ मते मिळाली, तर रमेश भेंडीगिरी यांना २४ मते मिळाली. २३मतांच्या फरकाने पांडे हे कोषाध्यक्षपदी निवडून असले.
बिनविरोध निवडून आलेले पदाधिकारी खालील प्रमाणे:-
१)अध्यक्ष :- अजितदादा पवार (पुणे).
२)उपाध्यक्ष:- १)देवराम भोईर (ठाणे), २)अमरसिंह पंडित (बीड), ३)शशिकांत गाडे (अहमदनगर), ४)दिनकर पाटील (सांगली), महिला राखीव १)शकुंतला खटावकर (पुणे), २)नेत्रा राजशिर्के (रत्नागिरी).
३) सरचिटणीस :- आस्वाद पाटील (रायगड).
४)सहचिटणीस :- १)रवींद्र देसाई (रत्नागिरी), २)मदन गायकवाड (सोलापूर), ३)मोहन गायकवाड, ४)महादेव साठे (उस्मानाबाद), महिला राखीव :-१) सिय्यदा पटेल (नांदेड), २) स्मिता जाधव (परभणी).
महत्त्वाच्या बातम्या:
–किंग कोहलीने मोडला ब्रेंडन मॅक्यूलमचा विक्रम, शोएब मलिकचाही विक्रम आहे धोक्यात
–रोहित शर्माच्या ‘विराट’ विश्वविक्रमाशी कर्णधार कोहलीने केली बरोबरी
–विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा आॅस्ट्रलियावर 6 विकेट्सने विजय
–हिटमॅन रोहित शर्मा आता या दिग्गजांमध्ये सामील
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’