७व्या कॉर्पोरेट सुपर ९ टी-२० क्रिकेट स्पर्धेत गालाघर, वेंकीज्, एम्प्टोरीज संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

पुणे। स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 7व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत गालाघर, वेंकीज व एम्प्टोरीज या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपुर्व फेरीत गणेश प्रजापतीच्या 38 धावांच्या बळावर गालाघर संघाने जीएस महानगर संघाचा 4 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अनिल बेलोटेच्या 42 धावांसह जीएस महानगर संघाने 9 षटकात 5 बाद 73 धावा केल्या. 73 धावांचे लक्ष गालाघर संघाने 8.6 षटकात 4 बाद 76 धावा करून पुर्ण केले. गणेश प्रजापती सामनावीर ठरला.

दुस-या लढतीत प्रविण पाटीलच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एम्प्टोरीज संघाने आय प्लेस इंडिया संघाचा 50 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना निखिल लोंढेच्या 31 व अजय निकमच्या 23 धावांसह एम्प्टोरीज संघाने 9 षटकात 4 बाद 56 धावा केल्या. 56 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रविण पाटील व निखिल लोंढे यांच्या अचूक व भेदक गोलंदाजीपुढे आय प्लेस इंडिया संघाचा डाव केवळ 7.4 षटकात सर्वबाद अवघ्या 6 धावांत अटोपला. प्रविण पाटील सामनावीर ठरला.

अन्य लढतीत अमित सिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वेंकीज संघाने अॅमडॉक्स संघाचा 6 गडी राखून पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उप-उपांत्यपुर्व फेरी
जीएस महानगर- 9 षटकात 5 बाद 73 धावा(अनिल बेलोटे 42, अतूल दागडे पाटील 32, शुभेंदू पांडे 1-11) पराभूत वि गालाघर- 8.6 षटकात 4 बाद 76 धावा(गणेश प्रजापती 38, अक्षय पाटील 2-28) सामनावीर- गणेश प्रजापती
गालाघर संघाने 4 गडी राखून सामना जिंकला.

एम्प्टोरीज- 9 षटकात 4 बाद 56 धावा(निखिल लोंढे 31, अजय निकम 23, विनित पीर 2-27) वि.वि आय प्लेस इंडिया- 7.4 षटकात सर्वबाद 6 धावा(प्रविण पाटील 3-6, निखिल लोंढे 2-9) सामनावीर- प्रविण पाटील
एम्प्टोरीज संघाने 50 धावांनी सामना जिंकला.

अॅमडॉक्स- 9 षटकात 5 बाद 40 धावा(अलोक पाटील 28, मयुर टिंग्रे 2-14) पराभूत वि वेंकीज्- 4.1 षटकात 2 बाद 46 धावा(अमित सिंग 35, गौरव कुमार 2-19) सामनावीर- अमित सिंग
वेंकीज् संघाने 6 गडी राखून सामना जिंकला