पहिली कसोटी: भारतीय संघाला पहिला झटका, अभिनव मुकुंद १२ धावांवर बाद

भारत विरुद्ध श्रीलंका या गॅले येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पहिला झटका हा अभिनव मुकुंदच्या रूपाने बसला आहे. मुकुंद २६ चेंडूत १२ धावा करून परतला आहे.

नियमित सलामीवीर बाद झाल्यामुळे मुकुंदला संधी देण्यात आली आहे. त्याने नुवान प्रदीपच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डाकवेललाकडे झेल दिला आहे.

सद्यस्थितीत भारत १७.४ षटकांत ८१/१ असून सलामीवीर शिखर धवन ४५ तर पुजारा २२ धावांवर खेळत आहे.