बर्थ-डे बाॅय गंभीरचा वाढदिवसालाच क्रिकेटमधील ‘गंभीर’ विक्रम

भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असणऱ्या गौतम गंभीरने विजय हजारे ट्राॅफीच्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना हरियाणा विरुद्ध धडाकेबाज खेळी केली आहे.

विजय हजारे ट्राॅफीतील उपउपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने अवघ्या 69 चेंडूत आपले शतक पुर्ण केले आहे. विशेष म्हणजे आपल्या 37 व्या वाढदिवशी गंभीरने शतक केले आहे.

गंभीर हा दिल्लीकडून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक करणारा रिषभ पंतसोबत संयु्क्तरीत्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळा़डू ठरला आहे.

याआधी मिथुन मन्हासने दिल्लीकडून खेळताना 2006 साली 68 चेंडूत शतक केले होते. तर 2018 मध्येच रिषभ पंतने 69 चेंडूत शतक केले होते.

भारताचा सलामीवीर शिखर धवनने दिल्लीकडून खेळताना 2008 साली 70 चेंडूत शतक केले होते. शिखर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हरियाणाने या सामन्यात दिल्लीसमोर विजयासाठी 230 धावांचे आव्हान ठवले होते. हे आव्हान दिल्लीने 39.2 षटकात 5 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. दिल्लीकडून गंभीरने सर्वाधिक 72 चेंडूत 104 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार मारले.

तसेत गंभीरने अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत राहुल द्रविडच्या 21 शतकांच्या विक्रमाची बरोबरी करताना सहावे स्थान मिळवले आहे.

गंभीरने या खेळीबरोबरच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 हजार धावाही पुर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो 9 वा भारतीय खेळाडू ठरला आहे.

भारताकडून अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा सचिन तेंडूलकरने(21999) काढल्या आहेत. त्यानंतर भारताचा माजी महान कर्णधार सौरव गांगुलीने (15622) धावा केल्या आहेत.

अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा अधिक धावा करणारे खेळा़डू- 

21999- सचिन तेंडूलकर

15622- सौरव गांगुली

15271- राहुल द्रविड

12931- मोहम्मद अझरूद्दीन

12703- महेंद्रसिंग धोनी

12663- युवराज सिंग

11221- विराट कोहली

10454- वीरेंद्र सेहवाग

10049- गौतम गंभीर

महत्वाच्या बातम्या-