कर्णधार इशांत शर्माच्या अनुपस्थितीत दिल्लीचे नेतृत्व करणार हा खेळाडू

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दिल्ली संघाला आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर याची उणीव जाणवणार आहे. तसेच जलदगती गोलंदाज ईशांत शर्माही फेब्रुवारीपासून हिमाचलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन सामन्यानंतर उपलब्ध होणार आहे.

कसोटी मालिकेत भाग घेतल्यानंतर इशांतला मंगळवारी दक्षिण आफ्रिकेतून परतल्यांनंतर लगेच संघासोबत भाग घ्यायला सांगितला आहे.परंतु त्याने विनंती करून पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली आहे. तो बाकी सामन्यात संघाचा कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडेल.

त्याच्या अनुपस्थितीत प्रदीप सांगवान दिल्लीच नेतृत्व करेल. त्याच्याच नेतृत्वाखाली दिल्लीने मुश्ताक अली स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते.

घोट्याच्या दुखापातीमुळे गौतम गंभीरला १० दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.

इशांतच्या जागी ऑफ स्पिनर शिवम शर्मा तर गौतम गंभीरच्या जागी मिलिंद कुमार या स्पर्धेत खेळताना दिसतील.

रॉयल चॅलेंजर बेंगलोर संघाचे भाग असलेले नवदीप सैनी, कुलवंत खेरोलिया आणि पवन नेगी यांना त्यांच्या संघाने योयो टेस्टला सामोरे जायला सांगितले आहे. हे तिन्ही खेळाडू दिल्लीच्या संघाचे भाग आहेत.