गौतम गंभीरचा आजपर्यंतचा सर्वात गंभीर निर्णय, सोडले या संघाचे कर्णधारपद

भारतात सर्वात महत्त्वाची समजली जाणारी रणजी ट्रॉफी ही देशांतर्गत स्पर्धा 1 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. या स्पर्धेतील दिल्लीचा पहिला सामना 12 नोव्हेंबरला होणार आहे. पण या सामन्याआधी भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने दिल्ली संघाचे कर्णधारपद सोडले आहे.त्यामुळे आता दिल्लीच्या नेतृत्त्वाची जबाबदारी युवा नितीश राणाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच उपकर्णधारपदाची जबाबदारी ध्रुव शोरे सांभाळेल.

गंभीरने या निर्णयाबद्दल ट्विट करुन माहिती दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की ‘युवा खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मला कर्णधारपदासाठी गृहीत न धरण्याची मी दिल्ली क्रिकेट असोसिएशनला विनंती केली आहे. मी नवीन कर्णधाराला सामने जिंकण्यात मागे उभा राहुन मदत करेल.’

मागील मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे नेतृत्व रिषभ पंत आणि इशांत शर्माने सांभाळले होते. पण यावेळी आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे ते उपलब्ध नसतील. त्यामुळे गंभीरला दिल्लीचे कर्णधार करण्यात आले होते.

गंभीरच्या नेतृत्वाखाली नुकतेच दिल्लीने यावर्षीच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. पण त्यांना अंतिम फेरीत मुंबईकडून 4 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला.

दिल्लीचे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबद्दल दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी सांगितले की ‘गौतमने दिल्लीचे निवडसमिती अध्यक्ष अमित भंडारी यांना कर्णधारपदासाठी त्याचा विचार करु नका असे आधीच सुचीत केले होते. त्याने एखाद्या तरुण खेळाडूला ही जबाबदीरी देण्यात यावी असेही सुचवले होते. नितीश राणा संघाचे नेतृत्व करेल. तर उपकर्णधारपदी ध्रुव शोरे असेल.’

शर्मा पुढे म्हणाले, “गंभीरने संघाचे नेतृत्व केले असते तर आम्हाला आवडले असते. पण त्याचबरोबर मी आनंदी आहे की गंभीरने माघार घेऊन नवीन कर्णधाराला तयार करण्यासाठी ही जबाबदारी सोडली.’

गंभीरने याचवर्षीच्या आयपीएलमध्येही पहिल्या काही सामन्यांनंतर दिल्ली डेअरडेविल्स संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्याच्याऐवजी दिल्ली डेअरडेविल्स संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या:

आजपासून हे स्टेडियम भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम नावाने ओळखले जाणार

सचिनप्रमाणेच विराटलाही भारतरत्न द्या, पहा कुणी केली मागणी

आज होत असलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात या ५ विक्रमांकडे नक्की लक्ष ठेवा

या कारणामुळे आजचा दिवस रोहित शर्माच्या कारकिर्दीत सुवर्णाक्षरांनी लिहीला जाणार

२०००सालापुर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले ६ खेळाडू आजही खेळतात क्रिकेट