भारतापुढे डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे हे आहे टार्गेट

श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ८ बाद २३६ धावा केल्या आहेत. परंतु इंनिंग ब्रेकनंतर पल्लेकेल येथे पाऊसाने हजेरी लावली. जर हा सामना डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतापुढे ४७ षटकांत २३१ धावांचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवत जसप्रीत बुमराहने ४, युझवेन्द्र चहलने २ तर अक्सर पटेल, केदार जादव आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. श्रीलंकेकडून मिलिंदा सिरीवर्दनाने सर्वोच्च ५८ तर चमारा कपुगेदराने ४० धावा केल्या.

खेळ भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरु होईल.