सौरव गांगुलीसह हे मोठे दिग्गज करणार अंडर १९ क्रिकेट विश्वचषकात समालोचन

उद्यापासून १२व्या १९ वर्षांखालील विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने समालोचकांची यादी जाहीर केली आहे. यात भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा यांचा समावेश आहे.

त्यांच्याबरोबरच या समालोचकांच्या यादीत अनेक मोठ्या माजी खेळाडूंची नावे आहेत. तसेच या यादीत अॅलन विल्किन्स हे एकमेव असे आहेत ज्यांनी एकही आंतराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. ते एक क्रीडा पत्रकार असून सध्या ते समालोचन करतात.

या विश्वचषकात एकूण १६ देश खेळणार असून उद्या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ४ सामने रंगणार आहेत.

भारतीय संघाचा पहिला सामना परवा १४ जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. यावर्षी १९ वर्षांखालील भारतीय संघाचे कर्णधारपद पृथ्वी शॉ कडे देण्यात आलेले आहे.

हे असणार १९ वर्षांखालील विश्वचषक २०१८ साठीचे समालोचक:

१. सौरव गांगुली( भारत )
२. टॉम मूडी(ऑस्ट्रेलिया)
३. इयान बिशप (विंडीज)
४. सिमॉन डौल (न्यूझीलंड)
५. डॅनी मॉरिसन (न्यूझीलंड)
६. एचडी अकर्मन(दक्षिण आफ्रिका)
७. अंजुम चोप्रा( भारत)
८. रॉब की (इंग्लंड )
९. निक नाईट (इंग्लंड)
१०. मार्क बुचर (इंग्लंड)
११. ग्रांट इलियट (न्यूझीलंड)
१२. ख्रिस हॅरिस (न्यूझीलंड)
१३. अॅलन विल्किन्स
१४. रसल अरनॉल्ड (श्रीलंका)