दादा ‘सौरव गांगुली’नेही मागितली हरभनकडे माफी

अमृतसर । भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हा तसा सोशल माध्यमांवर जास्त वेळ घालवत नाही. फार कधीतरी हा खेळाडू या माध्यमांवर पोस्ट करत असतो. परंतु असाच काल केलेल्या पोस्टमुळे मात्र दादाची चांगलीच पंचाईत झाली.

त्याचे झाले असे, भारताचा फिरकी गोलंदाज हरभन सिंग, त्याची पत्नी गीता बसरा आणि छोटी मुलगी हे अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दर्शनाला गेले होते. तेव्हा हरभजनने एक खास फोटो शेअर केला. ज्यात त्याचा संपूर्ण परिवार होता.

 

परंतु या फोटोतील भज्जीच्या मुलीला मुलगा समजून दादाने ट्विट केला.

यावर गांगुलीने कंमेंट करताना म्हटले, ” भज्जी बेटा बहोत सुंदर हैं, बहोत प्यार देना. ” (भज्जी मुलगा खूप सुंदर आहे. त्याला खूप प्रेम दे.)! गांगुलीला थोडासा गोंधळ झाल्यामुळे त्याने हा ट्विट केला. परंतु नेटिझन्सने लगेच गांगुलीला ट्रॉल करायला सुरुवात केली.

यावर गांगुलीने केवळ ६ मिनिटात दिलगिरी व्यक्त करत पुन्हा दुसरा ट्विट केला. त्यात गांगुली म्हणतो, ” मला माफ कर भज्जी. तुझी मुलगी सुंदर आहे. मी थोडासा वयस्कर होत चालल्यामुळे विसरत आहे. “

दुसऱ्या ट्विटच्या वेळी गांगुलीने आपल्याकडू चूक का झाली याचेही कारण दिले आहे.

यावर हरभजनने ट्विट करत म्हटले, ” दादा तुझ्या आशीर्वादासाठी खूप खूप आभारी आहे. सनाला माझ्याकडून खूप प्रेम. भेटू लवकरच. “