सचिन-विराटच्या तुलनेवर सौरव गांगुली म्हणतो

कोलकाता । भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या मते लगेचच विराटची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी करणे चुकीचे ठरेल. गांगुलीच्या मते विराटला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे.

विराटने काल जेव्हा कारकिर्दीतील ५०वे आंतरराष्ट्रीय शतक केले तेव्हा मोठ्या प्रमाणावर विराटची सचिनशी पुन्हा एकदा तुलना होऊ लागली. विराटच्या या खेळीमुळे भारत पराभवातून बाहेर येत सामना जिंकायचा विचार करत होता परंतु अंधुक प्रकाशामुळे भारताच्या स्वप्नावर पाणी फेरले गेले.

गांगुली म्हणतो, “दोघांची तुलना करणे खूप घाईचे ठरेल. त्याने आता ५० शतके केली आहेत. तो जर असाच खेळत राहिला तर नक्कीच मोठी कामगिरी करेल आणि खूप शतके बनवेल. “

भारताच्या दुसऱ्या डावाबद्दल बोलताना गांगुली म्हणाला, ” भारताने अतिशय योग्य वेळी डावाची घोषणा केली. भारताला सुरक्षित धावसंख्येवर डाव घोषित करणे गरजेचे होते आणि तेच भारताने केले. “