विम्बल्डन: अव्वल मानांकन असलेली अँजेलिक कर्बर स्पर्धेतून बाहेर

जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेली आणि स्पर्धेत अव्वल मानांकन मिळालेली अँजेलिक कर्बर विम्बल्डन २०१७ मधून बाहेर पडली आहे. तिला गर्बिन मुगुरुझाने पराभूत केले आहे.

१४व्या मानांकित गर्बिन मुगुरुझाने तीन सेट चाललेल्या या सामन्यात कर्बरचा ४-६, ६-४, ६-४ असा पराभव केला आहे. याबरोबर मुगुरुझाने विम्बल्डनची उप- उपांत्यपूर्व फेरी गाठली असून तिचा पुढील सामना स्वेत्लाना कुझनेत्सोव्हाशी होणार आहे.

स्वेत्लाना कुझनेत्सोव्हाने ऍग्निएस्का रॅडवन्स्कावर ६-२, ६-४ असा विजय मिळवत उप-उपांत्यपूर्व फेरी गाठली. ऍग्निएस्का रॅडवन्स्काला स्पर्धेत ९वे तर स्वेत्लाना कुझनेत्सोव्हाला ७वे मानांकन होते. १ तास ३१मिनिट चाललेल्या या सामन्यात कुझनेत्सोव्हाने रॅडवन्स्काला जास्त संधी मिळू न देता विजय संपादन केला.