या मैदानाच्या गेटला दिले जाणार सेहवागचे नाव

दिल्ली । भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि दिल्लीकर खेळाडू वीरेंद्र सेहवागचे नाव फिरोजशाह कोटला मैदानावरील गेट नंबरला २ ला दिले जाणार आहे. हा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

१ नोव्हेंबर २०१७ रोजी येथे भारत विरुद्ध न्यूजीलँड यांच्यातील पहिली टी२० खेळवली जाणार आहे त्याच्या एकदिवस आधी हा कार्यक्रम होणार आहे. 

” सेहवागने केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे आधीच्या व्यवस्थापनाने गेट नंबर २ ला त्याचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता आणि माझ्याकडून त्याची पूर्तता होणार आहे. ” असे दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोशिएशन प्रशासक माजी न्यायाधीश विक्रमजीत सेन म्हणाले.